u/mhtcetmodkemkc

No 50 50 rule for 2027

No 50 50 rule for 2027

99% confirm ho chuka hai guys🥰🥰💦💦💦💦💦💦

शिनगारे सर, महेश सर, दिनेश सर आणि संपूर्ण शिक्षक संघाला मनःपूर्वक सलाम! 🙏🌹

आज आझाद मैदानावर विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी उभारलेल्या आंदोलनात आपण सर्व शिक्षकांनी दिलेले योगदान खरोखरच अमूल्य आणि प्रेरणादायी आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी केवळ सहानुभूती व्यक्त न करता, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनाच्या मैदानात प्रत्यक्ष उतरून उभे राहणे, त्यांचा आवाज शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ठामपणे लढा देणे—ही शिक्षक म्हणून आपल्या सामाजिक बांधिलकीची सर्वोच्च जाणीव आहे.

आज आपण सिद्ध केले की, शिक्षक हे केवळ वर्गात शिकवणारे नसतात; ते विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी संघर्षाच्या वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे खरे मार्गदर्शक आणि समाजसेवक असतात.

आपल्या या निस्वार्थ सहभागामुळे विद्यार्थ्यांना केवळ आधारच मिळाला नाही, तर “आपल्या पाठीशी आपले शिक्षक आहेत” हा आत्मविश्वासही मिळाला.

माझ्या मुलासह असंख्य विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपण आज घेतलेले कष्ट, वेळ आणि ऊर्जा यांची शब्दांत किंमत करता येणार नाही.

आज आझाद मैदानावर विद्यार्थ्यांसाठी घुमलेल्या प्रत्येक आवाजाला आणि त्यामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक शिक्षकाला मनापासून सलाम! 🙏

आपल्या सर्वांच्या योगदानाला मनःपूर्वक शब्दसुमने आणि कोटी कोटी आभार! 🌹🙏 श्री. अनिल जाधव 🌹🙏 सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येत आहे की 2027 च्या परीक्षेसाठी 50-50 चा रुल येणार नाही. No 50-50 for year 2027

u/mhtcetmodkemkc — 10 days ago