
Solution pahije ahe bhavano aani taaino!
krupaya solution sanga.....Angavarr kaata yeto Khashabacha teaser tisryanda baghitla tari!! :-)))

krupaya solution sanga.....Angavarr kaata yeto Khashabacha teaser tisryanda baghitla tari!! :-)))
काल थिएटरमध्ये 'तुंबाडची मंजुळा' बघायला गेलो. मंगळवार असूनही ७०% थिएटर भरलेलं आणि लोक टाळ्या-शिट्ट्या वाजवत होते. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर, लोक याला का डोक्यावर घेतायत मला समजत नाहीये.
पहिली गोष्ट म्हणजे, यातलं सगळं कसं 'derivative' वाटतं. नावात 'तुंबाड' टाकून २०१८ च्या त्या गाजलेल्या सिनेमाचा हायप कॅश करायचा धंदा आहे हा. ऑनलाईन चेक केलं तर समजलं, हा 'सुलोचना फ्रॉम सोमेश्वर' या कन्नड सिनेमाचा अधिकृत रिमेक आहे. साऊथची कथा मराठी मातीत आणताना एवढी ओढाताण केलीये की त्यातला genuineness गायब झालाय.
दुसरं म्हणजे, सिनेमा बघताना स्पष्ट जाणवतं की डिरेक्टरची स्वतःची या कथेवर काहीच पकड नाहीये, ना काही भावनिक गुंतवणूक. का असणार? कारण हा विचार मूळ डिरेक्टरचा नव्हताच. हा झी स्टुडिओजच्या हेडचा कॉर्पोरेट प्रोजेक्ट होता. त्यांनीच हा सिनेमा सिलेक्ट केला, डिरेक्टर निवडला आणि नाव पण त्यांनीच सुचवलं. जेव्हा सिनेमा डिरेक्टरच्या पोटातील ऊर्जेतून येत नाही आणि फक्त एक प्रोजेक्ट म्हणून बनवला जातो, तेव्हा त्यातला आत्मा मरतो.
कथेचा जीव एकदम छोटा आहे, फक्त अंगात भूत आल्याचं नाटक करणं. आता एवढ्या छोट्या कथेवर तुम्ही अडीच तास सिनेमा ताणणार, तर कचरा होणारच. विनोद कसे आहेत? 'याने याच्या थोबाडात मारली आणि तो पडला'अश्या टाईपचे जुनाट आणि primitive प्रकार.
कथेतल्या पात्रांना स्वतःचे नक्की काय हेतू आहेत, हेच क्लिअर नाहीये. कॅरेक्टर्स एवढे संथ आहेत की त्यांच्या डोक्यात ट्यूबलाईट प्रकाशायला खूप वेळ लागतो. प्रेक्षक म्हणून स्क्रीनवर काय चाललंय हे मला आधी कळतंय आणि पात्रांना नंतर समजतेय.
आपल्याकडे सध्या साऊथची हवा चाललीये ना, म्हणून कथेची गरज नसताना गाणी, ओव्हर द टॉप अॅक्शन आणि प्रत्येक फ्रेमला स्लो-मोशन लावलाय. साऊथच्या सिनेमात जेव्हा हायपर-ट्रीटमेंट असते, तेव्हा ती कथेमधून नैसर्गिकरित्या येते. इथे कथेचा जीव लहान असल्यामुळे ती लाऊड ट्रीटमेंट प्रेक्षकांच्या गळ्याखाली जबरदस्ती उतरवली आहे.
हे निव्वळ lazy filmmaking आहे. तुम्हाला काय वाटतं?