u/ThickInitiative8978

आठवणींचा पाऊस – Nostalgia Event

​

नमस्कार मंडळी! 👋

सध्या पावसाने जोरदार एन्ट्री घेतलीये… प्रत्येक शहरात फक्त पाऊसच पाऊस! ☔

आणि खरं सांगायचं तर…

या सगळ्यात मजा फक्त लहान मुलांचीच असते ना? 😄

पण थांबा… पावसाळा आला की मोठ्यांमधलंही ते लहान मूल पुन्हा जागं होतं! ✨

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत एक खास, मनाला स्पर्श करणारा Event...

💭 आठवणींचा पाऊस

तुमचं काम अगदी सोपं आहे तुमच्या लहानपणीच्या पावसाळ्यातल्या आठवणी, मजेशीर किस्से, moments… लिहा आणि Community मध्ये पोस्ट करा! 📝

नियम: 🌧️ Post तुमच्या स्वतःच्या आठवणींवर आधारित असावी. ✍️ Marathi / English भाषेत चालेल. 📸 फोटो add केले तर bonus vibes! 🧠 Creative आणि nostalgic feel असणं महत्त्वाचं. 💬 इतरांच्या posts वर react करा, reply द्या, गप्पा मारा!

हा Event जिंकण्यासाठी नाही, तर: ✨ जुन्या आठवणी पुन्हा जगण्यासाठी ✨ मन हलकं करण्यासाठी ✨ आणि Community मध्ये एक emotional connect तयार करण्यासाठी आहे

चला तर मग… पावसाच्या सरींसोबत बालपणात पुन्हा हरवूया! ✨️

reddit.com
u/ThickInitiative8978 — 4 hours ago

रंगवेध : निळा रंग!

निळा रंग नाव आल तर डोळ्यासमोर सगळ्यात आधी सागर अणि आकाशच येतं...

Some glimpses of beautiful nature...!!

u/ThickInitiative8978 — 2 days ago

रंगवेध - Weekly Color Hunt🎨

No announcement needed the standard mod just arrived !!!!

रंगवेध - Weekly Color Hunt

नमस्कार मंडळी! 👋

आता दर आठवड्याला एक मजेशीर Community Activity सुरू करत आहोत...

Color Hunt

दर शनिवारी आम्ही एक रंग (Color) जाहीर करू.

तुमचं काम अगदी सोपं 📸 त्या रंगाला Main Subject ठेवून 3 te 6 फोटोचा एक Collage तयार करा आणि तो Photography flair 🏷 मध्ये पोस्ट करा.

नियम:

🎨 त्या आठवड्याचा रंग फोटोचा मुख्य विषय असावा.

📱 Mobile किंवा Camera, दोन्ही चालतील.

📷 जुने किंवा नवीन फोटो चालतील.

🖼️ एका सदस्याकडून एकच Collage.

💬 इतरांच्या फोटोंना प्रतिक्रिया द्या, कौतुक करा आणि चर्चा करा!

हे Challenge जिंकण्यासाठी नाही, तर:

✨ Photography Skills सुधारण्यासाठी

✨ Photographycha नवीन Perspective शोधण्यासाठी

✨ आणि Community मध्ये मजेदार Interaction वाढवण्यासाठी आहे.

चला तर मग...

पहिल्या Color Hunt साठी तयार राहा! 📸🔥

Green - हिरवा रंग

u/ThickInitiative8978 — 9 days ago

Flex Day

घुंगरू… कधीकाळी माझ्या प्रत्येक दिवसाचा आवाज होते,

माझ्या पावलांना ओळख देणारे,

पण आयुष्य पुढे सरकत गेलं,

आणि त्या नादाला कुठेतरी शांत व्हावं लागलं…

आज ते आहेत , पण फक्त आठवणींमध्ये.

​

आणि मग हे एक “vintage” घड्याळ…

२०००s मधलं ! कधी थांबत कधी सुरू होतं पण एक आठवण म्हणुन जपुन ठेवलय .

u/ThickInitiative8978 — 21 days ago

प्रवास....(pune exploration part : unknown)

The new girl in the city was never meant to be "new" and I found it in a very long way....I'm not a great travellar but observed enough to distinguish between "न" and "ण".😄

A passenger becomes a traveler,

a traveler becomes an explorer, and a never-ending journey begins.

Some moments don’t pass… they stay, quietly living within you , with every bus journey came new experiences, and every path whispered a new story.

The lanes, the homes, and the roads...all seemed to whisper stories of freedom with every step.

This journey didn’t took me to a destination instead,

it unfolded something within me.

And in all those changes, subtle and unseen, they quietly made me who I am rn . Little free and most importantly "little me".

So here are some glimpses !

u/ThickInitiative8978 — 25 days ago

सत्य अणि स्वप्ना!

"बाबा, मला तो फुगा हवा! थांबवा ना त्या काकांना..."

सगळ्या लहान मुलांसारखी माझी सुरुवातही हट्टापासूनच झाली. सर्कसमधल्या जोकरांना मोठ्याने "हाय" म्हणणं, डेथ व्हीलमध्ये माझ्या आवडत्या गाडीला आनंदाने पाठिंबा देणं, कार्टूनची वेशभूषा केलेल्या माणसांकडे आनंदाने धावत जाणं…

लहानपणातलं जग जरा वेगळंच होतं.

आता मात्र त्या फुग्याकडे नाही, तर त्याच्या मागे उभ्या असणाऱ्या माणसाकडे लक्ष जातं. त्यांच्या डोळ्यांत एखादा विशाल समुद्र असावा स्वप्नांनी भरलेला, पण तरीही कुठेतरी बंदिस्त. कदाचित अपूर्ण स्वप्नं… किंवा कदाचित स्वप्न पाहायची संधीच कधी मिळाली नसेल.

सर्कसमधला जोकर जेव्हा आपला मुखवटा काढत असेल, तेव्हा इतरांना हसवणारा तो माणूस स्वतःलाच ओळखत असेल का?

रस्त्यात अनेकदा आंधळी माणस दिसता, झुंजत असता न मिळालेल्या संधी सोबत, एक उमेद घेऊन. ह्या लोकांकडे बघुन कधी कधी वाटता कि मिच किती कृतघ्न आहे.

"माणूस पळता पळता स्वतःला विसरतो" हे आपण ऐकतोच.

पण काहीजण असेही असतात, जे स्वतःला कधीच ओळखू शकत नाहीत… आणि अनामिकपणे धावतच राहतात.

आयुष्य स्वप्नांनीच बांधलं जातं, पण कधी कधी त्या स्वप्नांना पायाच नसतो. मग माणूस एखाद्या सैरभैर पक्ष्यासारखा भटकत राहतो

कधी दाण्याच्या शोधात,

कधी हरवलेल्या वाटेच्या शोधात,

कधी लादलेल्या रस्त्यांवर चालत,

तर कधी "आता पर्यायच नाहीत" म्हणत आकाशातच घिरट्या घालत.

खरतर आपण मातीच्या घड्यांसारखे

कधी पाणी जास्त पडेल,

कधी वेळेआधीच सुकून जाऊ…

पण शेवटी त्या मडक्याला घडणं महत्त्वाचं.

असो… हे लिहिलेलं विचारांचं नवं अफू आहे,

की समाजाकडे पाहताना उमटलेली जाणीव ते मात्र कळत नाही.

reddit.com
u/ThickInitiative8978 — 28 days ago

मैत्री?

मानवी नात्यांमध्ये “मैत्री” ही सर्वात स्वच्छ आणि निष्कपट भावना मानली जाते, पण प्रत्यक्षात ती तितकीच गुंतागुंतीचीही असते. आपण अनेकदा मैत्रीला एक स्थिर, कायमस्वरूपी नातं समजतो जिथे दोघांची उपस्थिती, समज आणि आधार समान असतो. पण वास्तवात मैत्री ही स्थिर नसून प्रवाही असते; ती काळ, परिस्थिती आणि व्यक्तीच्या गरजांनुसार बदलत राहते. चूक अशी काही नसतेच त्यात पण हे समजून घ्यायला प्रत्येकाला आपापला वेळ लागतो.

काही मैत्री अशा असतात ज्या आपल्या अस्तित्वाला स्पर्श करतात. त्या आपल्याला शब्दांशिवाय समजतात, आपल्या शांततेतील अर्थ ओळखतात आणि आपल्या अपूर्णतेलाही स्वीकारतात. या मैत्रीत अपेक्षा कमी आणि स्वीकार जास्त असतो, म्हणूनच त्या टिकतात. त्या नात्यांमध्ये “असणं” महत्त्वाचं असतं काही सिद्ध करण्याची गरज नसते.

पण याचबरोबर काही मैत्री अशाही असतात ज्या केवळ गरजांवर उभ्या असतात. त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण “पर्याय” म्हणून असतो, “प्राधान्य” म्हणून नाही. त्यांची उपस्थिती आपल्या आनंदात दिसते, पण आपल्या वेदनेत ती कळत-नकळत अनुपस्थित असते. अशा वेळी जाणवतं , आपण ज्या नात्याला मैत्री मानत होतो, ते प्रत्यक्षात एक व्यवहारच होतं; जिथे भावनांचा वापर झाला, पण त्यांना परतावा मिळाला नाही. आणि खरंतर, परतावा मिळेल या अपेक्षेने जर मैत्री केली, तर ती मैत्री तरी कसली?

आणि मग काही मैत्री अशाही असतात ज्या नदीच्या प्रवाहासारख्या बदलत राहतात. पण त्या प्रवाहामागे कायम राहते ती डोंगरातून सुरू झालेली सुरुवात. नदी पुढे वाहत राहते . सगळं मागे सोडत. तसंच काही नात्यांचंही होतं; ती पुढे जातात, पण त्यांच्या सुरुवातीचा स्पर्श मात्र मनात कुठेतरी कायम राहतो.

मग मानवी स्वभावासमोर दोन पर्याय उभे राहता, नवीन सुरुवात करणं किंवा दरवाजा बंद करणं. मैत्रीवरचा विश्वास पूर्णपणे संपत नाही, पण अपेक्षा मात्र हळूहळू कमी होत जातात. कारण अपेक्षांचं ओझं हेच सर्वात जड असतं. ही माघार कमकुवतपणाची नसते , ती स्वतःला जपण्याची एक गरज असते. काही लोक मग मैत्री करणंच कमी करतात, किंवा मैत्रीचं ओझं पेलणं सोडून देतात.

मग प्रश्न उरतो ही “कायरता” आहे का, की एक जाणीव? आयुष्याच्या या टप्प्याला पूर्णपणे नाकारावं, की पुन्हा पुन्हा विस्कटलेल्या नात्यांना जोडत राहावं? कपड्याच्या घडीसारखं नातं विस्कटून टाकावं, की न सुटणाऱ्या पसाऱ्याला आवरत बसावं?

कदाचित उत्तर इतकंच अपेक्षा ही मैत्रीची सावली आहे. ती असली की प्रकाशही असतो; पण अंधार पडला की सावली नाहीशी होण्याची शक्यता निर्माण होतेच.

असो.

reddit.com
u/ThickInitiative8978 — 1 month ago