प्रयत्न केला. नक्कीच प्रतिसाद द्या भावांनो
वाट पाहता वाटेत
गाड़ी काही दिसेना
घट्ट धरूनी मुठीत
आठवण काही जाईना
काय झाल कस झाल
कळल काहीच नाही
वाट बघतच राहून गेलो रे
पण ती काही परत येईना
विचार केला की
विषय तिचा सोडावा
धरलेला हट्ट मोडावा
पण विषय काही
सुटत नाही
धीर काही
तुटत नाही
बसुन असतो असाच
एकटाच आशा धरून
कि एक गाड़ी येईल
तिचा त्यातून चेहरा दिसेल
हसत हसत तिनी
गाड़ी थांबवावी आणि
मला विचाराव की
अरे येड्या तू इथे कसा
आणि मी बोलाव
तुझीच वाट बघत होतो
पण गाड़ी काही
येत नाही
येते तर ती
फक्त तिची आठवण
मग असतोच परत मी
वाट पाहता वाटेत