u/goodwinausten

कॅप्टन रणगाडे यांचं काव्यसंग्रह प्रकाशित - निवडक मामा - अवश्य वाचा

कॅप्टन रणगाडे यांचं काव्यसंग्रह प्रकाशित - निवडक मामा - अवश्य वाचा

नेहमीच्या शिस्तीला आणि गंभीरतेला बाजूला ठेवून, कॅप्टन रणगाडे एका अनाकलनीय मूडमध्ये असताना डिसकॉर्ड सर्वर वर उतरवलेल्या कवितांची ही एक भन्नाट मैफल आहे. कॅप्टन रणगाडे यांच्या नेहमीच्या हटके लेखनशैलीची आणि त्यांच्या प्रसिद्ध थुकरट जोक्सची पुरेपूर पेरणी या संग्रहात पाहायला मिळते. यातले काही context डिसकॉर्ड वासियांना समजतील.

कॅप्टन रणगाडे उर्फ u/Intelligent-Lake-344

पुस्तकाची PDF अवृत्ती ठराविक काळासाठी खालील लिंक वर मोफत उपलब्ध आहे. नंतर ऍमेझॉन व इतर नामांकित प्लॅटफॉर्म्स वर ₹७० मध्ये उपलब्ध होईल. तर लवकर डाउनलोड करा.

डिसकॉर्ड वर या पुस्तकाची PDF अवृत्ती कायमस्वरूपी उपलब्ध राहिल.

लिंक: निवडक मामा-कॅप्टन रणगाडे

u/goodwinausten — 5 days ago

दैनिक महाSocial: संपादक पेपर छापून मैत्रिणीला भेटायला गेलेत. मला वाटप करायला सांगितलंय

आजची paranormal story : u/Aarch2504

u/goodwinausten — 2 months ago

मूळ संपादक "नॉट रिचेबल". But the show must go on!

संपादक २ दिवसांपासून अज्ञातवासात आहेत. तो पर्यंत गाडीला ढकलत पुढे नेतोय.

u/goodwinausten — 3 months ago

पिवळंवेध 🟡

जैसलमेरचं थोडं पिवळसर नारंगी सूर्यास्त पिवळं म्हणून चालवून घ्या.

u/goodwinausten — 3 months ago

गुणी बाळाचे गुण दिसायला लागले. दांडी मारली आज.

संपादक गुणी बाळंच आहे. u/Academic_Taro_9967

मी आज फक्त डिलीव्हरी बॉय आहे.

u/goodwinausten — 3 months ago

पुस्तकप्रेमींसाठी खास संधी! ऑगस्ट Buddy Read साठी तुमची आवडती पुस्तकं सुचवा 📖✨

नमस्कार पुस्तकप्रेमींनो! 👋

आमचा चालू असलेला Buddy Read Event ऑगस्ट महिन्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे! हा संपूर्ण उपक्रम आमच्या Discord Server वर पार पडतो, जिथे आम्ही दरमहा मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे एकत्र वाचन करतो.

मला सांगायला आनंद होतोय की, या वर्षात आतापर्यंत आपण सगळ्यांनी मिळून १४ हून अधिक पुस्तके वाचून पूर्ण केली आहेत! 🎉

ऑगस्ट महिन्यासाठी वाचन संकल्प: आम्ही ऑगस्ट महिन्यासाठी पुस्तकं निवडण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत. जर तुम्हाला कोणते मराठी किंवा इंग्रजी पुस्तक वाचायची इच्छा असेल, तर या पोस्टखाली किंवा थेट आमच्या Discord सर्व्हरवर नक्की सुचवा.

📌 महत्त्वाच्या तारखा:

  • पुस्तके सुचवण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै
  • व्होटिंग सुरू होण्याची तारीख: ३१ जुलै
  • व्होटिंगनंतर एक मराठी आणि एक इंग्रजी पुस्तक ऑगस्ट महिन्यासाठी निवडले जाईल.

या Discord वाचन ग्रुपमध्ये का सहभागी व्हावे?

  • नवीन वाचकांसाठी उत्तम सुरुवात: जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल, तर सोबत वाचल्यामुळे उत्साह टिकून राहतो.
  • प्रगतीसोबत चर्चा (Chapter-wise Discussions): Discord वर प्रत्येक पुस्तकासाठी वेगळे थ्रेड असतात. जसे जसे अध्याय पूर्ण होतील, तशी त्यावर इतर वाचकांसोबत गप्पा आणि चर्चा करता येतात.
  • मराठी साहित्याची ओळख: समृद्ध मराठी साहित्याची ओळख आणि अनुभव घेण्याची ही नामी संधी आहे.
  • एक छान वाचक कम्युनिटी: पुस्तकांवर चर्चा करण्यासोबतच नवीन मित्र बनवण्याची ही उत्तम जागा आहे.

तुम्ही आधीपासून नियमित वाचत असाल किंवा नव्याने सुरुवात करत असाल, सर्वांचे Discord सर्व्हरवर मनापासून स्वागत आहे!

👉 आमचा Discord Server जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: महाराष्ट्र सोशल डिस्कॉर्ड सर्वर

चला तर मग, Discord वर भेटूया आणि ऑगस्ट महिन्यात एकत्र मिळून वाचनाचा आनंद घेऊया! 📖✨

u/goodwinausten — 3 months ago

गुलाबीवेध 🩷

शेवटचा दरवाज्याचा फोटो जयपूर मध्ये काढलेला होता. जयपूरचा "पिंक" आपल्या नेहमीच्या गुलाबीपेक्षा थोडा वेगळा आहे.

u/goodwinausten — 3 months ago

काव्यप्रेमी रसिकांनो आणि कवी मनाच्या मित्रांनो! 🌸✨

तुमच्यातील कवीला आणि काव्यप्रेमाला एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, मागच्या दोन महिन्यांपासून अविरत सुरू असलेला आपला आवडता उपक्रम 'काव्यवार कवी संमेलन' पुन्हा एकदा सज्ज झाला आहे! दर आठवड्याला कित्येत कवींना आणि रसिक प्रेक्षकांना एकत्र आणणारा हा प्रवास आता एका नव्या वळणावर आहे, आणि यामध्ये तुमच्या सहभागाशिवाय मजा अपूर्ण आहे.

या संमेलनात काय खास असेल? 🤔

  • स्वतःच्या कविता सादर करा: जर तुम्ही लिहित असाल, तर तुमच्या भावनांना जगासमोर मांडण्याची हीच उत्तम संधी आहे.
  • आवडत्या कवींच्या रचना वाचा: स्वतः लिहीत नसाल तरी हरकत नाही! तुम्हाला आवडलेल्या इतर नामवंत किंवा मित्र कवींच्या कविता तुम्ही इथे सादर करू शकता.
  • कवितेमागची गोष्ट सांगा: ती कविता तुम्ही का लिहिली? किंवा ती विशिष्ट कविता तुम्हाला का आवडते? याबद्दल मनमोकळा संवाद साधा.
  • फक्त ऐकण्याचा आनंद घ्या: तुम्हाला लिहायला किंवा वाचायला आवडत नसेल, तरी चालेल! तुम्ही फक्त एक रसिक श्रोता म्हणून येऊन इतर कवींच्या सुंदर रचनांचा आनंद लुटू शकता. तुमच्यातील रसिकाला एक नवीन अंकुर फुटू द्या!

कधी आणि कुठे? 🗓️📍

  • दिवस आणि तारीख: या रविवारी, १९ जुलै. रात्री १० वाजता.
  • व्यासपीठ: आपले हक्काचे महाराष्ट्र सोशल डिस्कॉर्ड सर्वर

सहभागी कसे व्हायचे?

  • या अप्रतिम आणि सुरेल उपक्रमाचा भाग होण्यासाठी आजच आमच्या डिस्कॉर्ड सर्वरचे मेंबर व्हा आणि रविवारची संध्याकाळ शब्दांच्या दुनियेत साजरी करा!
  • लिंक: महाराष्ट्र सोशल डिस्कॉर्ड सर्वर

चला तर मग, वाट कसली बघताय? या रविवारी अवश्य उपस्थित राहा, स्वतःची हजेरी लावा आणि या सोहळ्याची शोभा वाढवा. आम्ही तुमची वाट पाहत आहोत! 🎤✍️

u/goodwinausten — 3 months ago

A social and relaxing community for Marathi people: r/MaharashtraSocial

r/MaharashtraSocial The chillest Marathi subreddit from Maharashtra! Gappa, memes, fitness, thoughts, food & everything that makes Marathi life awesome! There is everything here except Politics! Join today to discover amazing people across Maharashtra.

reddit.com
u/goodwinausten — 3 months ago

श्रेष्ठ मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांची आज जयंती

यांचं पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. जन्म १० जुलै १९२३, बेळगाव मध्ये झाला. त्यांनी चिरकाल दुःखाचा धांडोळा आणि मानवी मनाचा वेध घेतला, मानवी नात्यातील गुंतागुंत कथेच्या माध्यमातून व्यक्त केली आणि बहुरंगी, बहुढंगी स्वभावाच्या, फिरत्या केंद्राच्या कथा लिहिल्या.

साहित्य अकादमीने १९७३ मध्ये "काजळमाया" या संग्रहाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून पारितोषिक दिले परंतु त्यांनी काही करणामुळे हे पारितोषिक परत केले. विशेष म्हणजे त्यांच्या संग्रहला सोडलं तर २०११ पर्यंत कोणत्याही "कथासंग्रहला" साहित्य अकादमीचा पुरुस्कार प्राप्त झाला नव्हता.

मराठी साहित्यात "कथा" या वाङ्मयप्रकाराला दीर्घकाळ दुय्यम स्थान दिले गेले होते. केवळ रंजन करणारा किंवा मनोरंजनाचे साधन म्हणूनच या प्रकाराकडे पाहिले जात होते. जी. ए. यांच्यासारख्या दिग्गजांनी या प्रकाराला मराठी साहित्यात अत्यंत प्रभावी स्थान प्राप्त करून दिले.

जी. ए. यांचा मृत्यू ११ डिसेंबर, १९८७ पुणे येथे झाला.

जी. ए. यांच्य काही प्रमुख साहित्यकृतींची यादी खालीलप्रमाणे.

प्रमुख कथासंग्रह:

- निळासावळा (१९५९)-पहिला प्रसिद्ध कथासंग्रह.

- पारवा (१९६०)

- हिरवे रावे (१९६२)

- रक्तचंदन (१९६६)

- काजळमाया (१९७२)

- पिंगळावेळ (१९७२)

- रमलखुणा (१९७५)

- सांजशकुन (१९७५)

- डोहकाळिमा (१९८७)

इतर कथासंग्रह आणि ललित लेखन:

- माणसे अरभाट आणि चिल्लर

- बखर बिम्मची

- मुग्धाची रंगीत गोष्ट

- कुसुमगुंजा

- दिवस तुडवत अंधाराकडे

- पेरू

अनुवादित साहित्य:

- शिवार (काँरड रिश्टर यांच्या "The Fields" चा अनुवाद)

- गाव (काँरड रिश्टर यांच्या "The Town" चा अनुवाद)

- रान (काँरड रिश्टर यांच्या "The Trees" चा अनुवाद)

- अमृतफळे

- आकाशफुले

- सोनपावले

- पैलपाखरे

- स्वातंत्र्य आले घरा

- रानातला प्रकाश

ही पोस्ट लिहिण्यास प्रेरित करणारे आमचे खास मित्र व ग्रंथपाल u/Fit_Bicycle_4 यांचे आभार.

वैयक्तिक कामामुळे पोस्ट टाकण्यास जरा (म्हणजे बराच) उशीर झाला व त्यामुळे ही "लो एफ्फर्ट" टाकून लिहीली आहे. वाचकांनी त्याबद्दल थोडं "ऍडजस्ट" करून सहकार्य करावे.

धन्यवाद.

u/goodwinausten — 3 months ago

🎭 डिस्कॉर्ड रंग मंदिर: Streaming श्रीमंत दामोदर पंत this Friday!🍿

नमस्कार नाट्यप्रेमींनो! 🙏

मराठी माणसाचं आणि नाटकाचं एक वेगळंच नातं आहे. पण धावपळीच्या आयुष्यात किंवा घरापासून दूर असल्यामुळे आपल्याला हवं तेव्हा नाट्यगृहात जाऊन नाटक बघता येत नाही. म्हणूनच, आपण सगळे एकत्र येऊन हे सेलिब्रेट करणार आहोत!

आम्ही आपल्या MH Social Discord Server वर श्रीमंत दामोदर पंत या लोकप्रिय मराठी नाटकाचं लाइव्ह स्ट्रीमिंग आयोजित केलं आहे.

एकत्र नाटक बघण्याची मजा काही वेगळीच असते! फक्त नाटक बघायचं नाहीये, तर नाटक बघता बघता गप्पा मारायच्या आहेत, डायलॉग्सवर टाळ्या वाजवायच्या आहेत आणि एकत्र एन्जॉय करायचं आहे. जणू काही आपण सगळे एकाच नाट्यगृहात एकत्र बसलोय असा फील येणार आहे!

कार्यक्रम नक्की कधी आहे?

🗓️ दिनांक: शुक्रवार १० जुलै

⏰ वेळ: रात्री १०:३० वाजता

🎭 नाटक: श्रीमंत दामोदर पंत

तुम्ही तुमचे शेंगा, फुटाणे, पॉपकॉर्न आणि चहा घेऊन तयार राहा. तुमच्या मित्रांनाही सोबत घेऊन या, कारण जितकी जास्त गर्दी, तितकी नाटकाची मजा दुप्पट होईल! 🎉

डिस्कॉर्ड सर्व्हरची लिंक: [MH Social Discord Server](https://discord.gg/pQcy9CVD6p)

u/goodwinausten — 3 months ago

घरगुती ढोकळा

गुजरात मध्ये याला खमण म्हणतात आणि ढोकळा जरा वेगळा असतो, fermentation करून बनवलेला. आपल्या इथे ढोकळा हेच नाव प्रचलित आहे.

u/goodwinausten — 3 months ago

Full Protein Breakfast! (A food post from me too 🤪)

कमेंट्स मध्ये सांगा कोणता पक्षी आहे.

u/goodwinausten — 4 months ago

Happy National Doctors' Day

On National Doctors' Day, we extend our heartfelt gratitude to all the doctors across r/MaharashtraSocial who dedicate their lives to healing, caring, and saving others.

Your compassion, expertise, and tireless commitment make a difference every single day. Whether in hospitals, clinics, rural health centers, or emergency rooms, your service strengthens our communities and brings hope to countless families.

Thank you for your unwavering dedication, especially in challenging times. Wishing all doctors a very Happy National Doctors' Day!

PC: u/DilatedDrama

u/goodwinausten — 4 months ago