u/Interesting-Bobcat52

▲ 6 r/nashik

मी दहावीला असताना नाशिक मधे आलो, दहावी ते बारावी शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो, इथे उच्चशिक्षण घेतले, आणि नोकरी मिळाली. शाळेतल्या खूप आठवणी आहेत, चांगल्या आणि वाईटही. सातपूर-गंगापूर लिंक रोडला, नंतर KK वाघ कॉलेजजवळ घरच्यांसोबत होतो.

नाशिक खूप छान, आणि शांत होते. रस्ते चांगले, खूप झाडे, लोक चांगली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिकचा पाऊस. दिवसात १२-१६ तास पाऊस पडायचा आणि घरी असतांना तितकेच चांगले वाटायचे. मला नाशिक अजूनही खूप आवडतं. माझा भाऊ आम्ही नाशिक येण्याआधी वादतीगृहात रहात असे. तो आल्यानंतर अजून जास्त मज्जा वाटायची. मला आता खूप वर्ष झाली नाशिकमध्ये येऊन. नोकरी मिळाली तर नक्कीच नाशिकला स्थलांतरित व्हायचे आहे. नाशिक म्हणजे शहर आणि गाव दोन्हींचा समतोल.

अचानक आठवण आली तर विचार केला बघू नाशिकचा सब, आणि लिहू काहीतरी. : )

reddit.com
u/Interesting-Bobcat52 — 16 days ago