
राजा शिवाजी रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट ट्रेलर पाहून अपेक्षा थोड्या वाढल्या होत्या कसा असेल त्याचा,
जमेच्या बाजू:
१.3 तास रनटाईम असलेला ह्या मूव्ही मध्ये कुठेही कंटाळवाणा वाटत नाही स्क्रीनप्ले उत्तम जमला आहे
२. अजय - अतुल ह्यांनी नेहमीप्रमाणे उत्तम काम केलंय, म्युझिक मुले काही सीन्स अजून प्रभावशाली झालेले दिसतात
३. सर्व मराठी कलाकारांनी उत्तम काम केलंय, बाळ शिवाजी हे पात्र रिआन देशमुख ह्याने केलंय आणि अतिशय उत्तम जमलंय त्याला, विद्या बालन, फरदीन खान, अमोल गुप्ते, भाग्यश्री, अभिषेक बच्चन,संजय दत्त ह्यांनी सुद्धा चांगले काम केलीत
४. काही ऍक्शन सिक्वेन्स उत्तम झालेत थोडे फास्ट वाटतात पण चालून जातात
५. सिनेमा ऐतिहासिक संदर्भाप्रणामे ठेवण्याचा उत्तम प्रयत्न झाला आहे, ज्यांना इतिहास माहित आहेत त्यांना ते संदर्भ लगेच समजतात त्यामुळे सिनेमा अजून सोपा होतो समजण्यासाठी
कमकुवत बाजू:
१.VFX काही ठिकाणी गांडालय सिनेमाच्या बजेट प्रणाम vfx वर काम झालेलं दिसत नाही
२. हिंदी कलाकारांचे मराठी उच्चार गांडलेत खूपच अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जेनेलिया ह्यांनी प्रयत्न केलाय पुरेपूर पण नाही जमलं
३. रितेश देशमुखने खूप प्रयत्न केलाय छ. शिवाजी महाराज साकारण्याचा पण कुठे तरी कमी पडला त्याच्याकडे पाहून ती छबी नव्हती दिसत महाराजांची
माझ्याकडून ३/५