विदर्भातलं आख्खं गावच वाहून गेलं; 204 जणांना जलसमाधी, 35 वर्षांपूर्वीचा 'तो' काळाकुट्ट दिवस! 30 जुलै...
​
30 जुलै... नागपूर जिल्ह्यातील मोवाड गावासाठी आजही हा दिवस काळा दिवस म्हणूनच स्मरणात आहे. 30 जुलै 1991 रोजी आलेल्या भीषण महापुराने अवघं मोवाड गाव अक्षरशः उद्ध्वस्त केलं. या दुर्घटनेला आज 35 वर्षे पूर्ण झाली असली, तरी त्या महापुराच्या जखमा आजही गावकऱ्यांच्या मनात ताज्याच आहेत.
1867 मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेली मोवाड नगरपरिषद ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक मानली जाते. शेती, विणकामाचा व्यवसाय आणि गजबजलेली बाजारपेठ यामुळे मोवाडला "सोन्याचं कवाड" म्हणून ओळखलं जात होतं. मात्र, काही क्षणांतच या समृद्ध गावाचं वैभव महापुराच्या पाण्यात वाहून गेलं.
मोवाडला 'सोन्याचं कवाड' का म्हटलं जायचं?
30 जुलै 1991 च्या दुर्घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आणि मोवाडचे माजी मुख्याध्यापक रामकृष्ण रंभाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोवाड नगरपरिषदेची स्थापना 17 मे 1867 रोजी इंग्रजांनी केली होती. अवघी दहा हजार लोकसंख्या असूनही येथील आर्थिक समृद्धी, विणकाम उद्योग, शेती आणि मोठी बाजारपेठ पाहून मोवाडला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला.
या परिसरात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गावाला "मोवाड" हे नाव पडल्याचेही सांगितले जाते. अनेक वर्षे हे गाव आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखले जात होते.
एका पहाटेने बदललं सगळंच
30 जुलै 1991 ची पहाट मोवाडसाठी विनाशकारी ठरली. जाम नदीवरील धरण फुटल्याने मोवाडसह तब्बल 13 गावांना महापुराचा तडाखा बसला. खैरगाव, थुगावदेव, मदना, जलालखेडा यांसह अनेक गावांमध्ये पाण्याने थैमान घातलं.
दुर्घटनेपूर्वी सलग तीन-चार दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. जाम आणि वर्धा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. नगरपरिषदेने धोक्याचा इशारा दिल्यानंतर गावकरी जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागले. काहींनी उंच इमारतींचा आधार घेतला, तर काहींनी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतला.
बाजारपेठेतील बंडू गुप्ता यांच्या इमारतीवर अनेकांनी आसरा घेतला होता. मात्र, दुर्दैवाने ती इमारतही कोसळली आणि त्याखाली अनेकांचा मृत्यू झाला. काही क्षणांतच संपूर्ण गाव पुराच्या पाण्याखाली गेले आणि सर्व काही होत्याचं नव्हतं झालं.
204 जणांना जलसमाधी
शासकीय नोंदीनुसार या भीषण पुरात 204 जणांचा मृत्यू झाला. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या मते मृतांचा खरा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अनेक जण बेपत्ता झाले होते. काही महिला माहेरी आल्या होत्या, तर काही बाहेरगावी असल्याने नेमकी नोंद होऊ शकली नाही.
पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी अनेकांनी जीवाची पर्वा केली नाही. पोलीस हवालदार समाधान इंगळे यांनी स्वतःच्या कुटुंबासह इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करताना प्राण गमावले. अंमलदार वामन मेंढे यांनीही बचावकार्यादरम्यान आपला जीव अर्पण केला. त्यांच्या शौर्याची आठवण आजही गावकरी कृतज्ञतेने काढतात.
हजारो एकर शेतीचं नुकसान
या महापुरात शेतीचंही प्रचंड नुकसान झालं. गावाच्या पुनर्वसनासाठी सुमारे 450 एकर जमीन संपादित करण्यात आली. इंदिरानगर परिसरातील सुमारे 50 एकर जमीन, रेल्वे मार्गालगतची 200 ते 300 एकर जमीन तसेच पुराच्या प्रवाहात वाहून गेलेली शेकडो एकर शेती अशा मिळून जवळपास हजार एकर जमिनीचं नुकसान झालं.
या आपत्तीनंतर अनेक शेतकरी भूमिहीन झाले आणि त्यांना मजुरीवर उदरनिर्वाह करावा लागला. विणकामाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात खिळखिळा झाला. एकेकाळी समृद्ध असलेलं मोवाड आर्थिकदृष्ट्या मागे पडलं.
आजही जिवंत आहेत त्या आठवणी
1991 च्या महापुरातून बचावलेल्या काही जुन्या इमारती आजही त्या भीषण घटनेच्या साक्षीदार म्हणून उभ्या आहेत. त्यांच्या भग्न भिंती त्या काळ्याकुट्ट दिवसाची आठवण करून देतात.
या दुर्घटनेत जवळपास प्रत्येक कुटुंबाने आपलं कुणी ना कुणी गमावलं. 35 वर्षे उलटून गेली असली, तरी त्या दिवसाच्या आठवणी आजही गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणतात. मोवाडच्या इतिहासातील हा दिवस कधीही विसरता येणार नाही.
Nagpur's youth was lathicharged, त्याने कुठल्याही प्रकारची हिंसा केलेली नाही. लोकशाही कुठे पडली आहे आपल्या देशात ⁉️ आपले शिकलेले भविष्य सरकार पायाखाली तुडवत आहेत! हा अन्याय आहे! #जंतरमंतर
सुंदराबाई खंडेलवाल टॉवर, अकोला अकोला शहराच्या मध्यभागी डौलाने उभा असलेला सुंदराबाई खंडेलवाल टॉवर (ज्याला स्थानिक पातळीवर 'टॉवर' किंवा 'क्लॉक टॉवर' म्हणून ओळखले जाते) हे या शहराचे एक प्रमुख ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्वाचे ठिकाण आहे.
निसर्गवैभवाचा अथांग खजिना: नयनरम्य 'मेळघाट'! सात घाटांचा मेळ असलेले अमरावती जिल्ह्यातील 'मेळघाट' हे क्षेत्र म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत आणि विलोभनीय चमत्कार आहे. उंच डोंगरदऱ्या, खळाळणारे धबधबे आणि घनदाट जंगलांनी वेढलेला हा प्रदेश अचलपूर, चिखलदरा आणि धारणी या तीन तालुक्यांमध्ये विस्तारला आहे.
आपल्या आगळ्यावेगळ्या आणि कुरकुरीत चवीमुळे 'शेगाव कचोरी' अवघ्या विदर्भातील खवय्यांच्या मनावर राज्य करत आहे. संत गजानन महाराजांच्या शेगावची ही खुसखुशीत आणि गरमागरम कचोरी एकदा खाल्ली, की तिची अप्रतिम चव जिभेवर रेंगाळत राहते. 😋😋
हा टक्केवारीचा प्रकार हा ग्रामपंचायत पासून, महापालिका, जिल्हा परिषद, मंत्रालय पर्यंत सगळीकडे सेम आहे..
पेट्रोलमध्ये ५% इथेनॉल पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल पेट्रोलमध्ये ८०% इथेनॉल फक्त इथेनॉल वर चालणाऱ गाड्या... १००% इथेनॉल 😂 श्री. गडकरीजी, जर हीच वेळ येणार असेल, तर पेट्रोल पंपावर जायची गरजच काय? उसाचा रस ज्यूस कॉर्नरवर सुद्धा मिळतो—मग तुमच्या मुलाला पैसे का द्यायचे?
With global uncertainties rising, should I post pone constructing house
I have monthly income of around 2 lakh. Was planning to take loan of around 1 cr