▲ 18 r/pune

नवरात्रोत्सव

तुळजाभवानी माता

u/Cool_Aai — 4 days ago
🔥 Hot ▲ 5.9k r/JalJangalJameen+1 crossposts

गणेशोत्सव

या विसर्जनाला गणरायाला साक्षी ठेवून आपण एक शपथ घेऊया जे मानवी आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि समाजासाठी घातक आहे, त्याचं विसर्जन करूया.

ध्वनीप्रदूषण करणारा अनावश्यक DJ, कानठळ्या बसवणारा आवाज, पाण्याला आणि निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तू, प्लास्टिकचा अतिरेक, अस्वच्छता आणि उत्सवाच्या नावाखाली होणारा उधळपट्टीचा दिखावा—या सगळ्याला आपण “विसर्जित” करूया.

आणि त्याऐवजी माणसाच्या आरोग्याचं, निसर्गाचं, नदी-तलावांचं, प्राण्यांचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं संवर्धन करूया.

u/Cool_Aai — 22 days ago
▲ 21 r/pune

बातमी मागील बातमी

u/Cool_Aai — 1 month ago
▲ 1 r/Odisha+1 crossposts

पद्मश्री

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत, "पद्मश्री" पोस्टाने पाठवा साहेब,

ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी "श्री" लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त,

त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की, दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत "पद्मश्री" पोस्टाने पाठवा साहेब,

अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची.

कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी, कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे. आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या "हलधर ग्रंथावली - भाग -2" याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय.

साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत.

हि खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधर जी सारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर.

श्री हलधर जी याची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर हि पोस्ट करतोय. ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले, आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधर जी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडवि लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.

नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन, पेन्सिल, शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले. आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले.

आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधर जी यांनी 1995 च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत "राम शबरी" सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची हि कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल "पद्मश्री" पुरस्कार जाहीर झाला.

अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधर जी फक्त तिसरी पर्यत शिकलेलं पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.

त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,

आप किताबो में प्रकृति को चुनते है

पद्मश्रीने, प्रकृति से किताबे चुनी है।।

डीडी क्लास : भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधर जी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. "सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असत" अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच हि आजची हलधर जी याची कहाणी तुम्हांपुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो,

काहीही होवो, रडायच नाही

तर लढायच आणि लढून जिंकायच.

reddit.com
u/Cool_Aai — 2 months ago
▲ 111 r/pune

शुभेच्छा

नागपंचमीच्या शुभेच्छा

u/Cool_Aai — 2 months ago
▲ 105 r/MaharashtraSocial+1 crossposts

असेही ध्वजवंदन

वेगळे काही अनुभवावे असे

u/Cool_Aai — 2 months ago

एक अकेला

World Music Day Concert 2026.

एक अकेला हिंदुस्तानी, दो मिले तो हिंदुस्तान..

When Sourendro–Soumyojit requested Gulzar Sahab to write a song that celebrates our motherland through the lens of today’s India, he responded with these verses of rare beauty..!!

Performers:

•Gulzar Saheb

•Soumyojit Das

•Vishal Bhardwaj

•Nikita Gandhi

•Anupam Roy

•Kalpana Patowary

•Benny Dayal

•Rekha Bhardwaj

•Shilpa Rao

•Hariharan

•Parvathy Baul

•Shankar Mahadevan

•Ayaan Ali Bangash

•Vishwa Mohan Bhatt

•Harshavardhan Neotia.

अवश्य देखिए

u/Cool_Aai — 2 months ago

रंगात रंगुनी

रंगात रंगुनी रंग माझा वेगळा

u/Cool_Aai — 2 months ago
▲ 12 r/pune

Forest man

आपल्याला हे नक्की माहीत पाहिजे

u/Cool_Aai — 2 months ago
▲ 28 r/MaharashtraSocial+1 crossposts

मैत्री दिन

मैत्री दिनाच्या शुभेच्छा

u/Cool_Aai — 2 months ago

गिनीज बुक

*पंढरपूर तीर्थक्षेत्र गिनीज बुक मध्ये दाखल*

*एकाच दिवशी सर्वात जास्त भाविक भेटलेले पवित्र ठिकाण म्हणून गौरव व नोंद केली आहे.*

🚩🚩 *राम कृष्ण हरी* 🚩🚩

u/Cool_Aai — 3 months ago
▲ 32 r/MaharashtraSocial+1 crossposts

गुरुपौर्णिमा

गुरु

निसर्ग....

आईवडील....

नात्यातील सदस्य...

शैक्षणिक गुरू....

पृथ्वीतलावरील सर्वच महापुरुष...

वाचलेले प्रत्येक पुस्तक...

भेटलेली प्रत्येक व्यक्ती....

जीवनात घडलेली प्रत्येक घटना...

जीव लावणारे मित्र...

लाडके प्राणी...... सारे गुरूस्थानी..

सरते शेवटी... संकटातून स्वतःला सावरत मार्गक्रमण करणारे स्वतः आपण.... कधी कधी आपणच आपले गुरू असतो

🙏🏻

आयुष्यात भेटणारा प्रत्येक जण एक प्रकारे आपले गुरुच असतात

तेच आपल्याला शिकवतात तेच आपल्याला अनुभव देतात आणि तेच आपल्या मागे आपल्या दुःखात आपल्या सोबत उभे राहतात

म्हणून या सर्व गुरूंना गुरु पौर्णिमेचा साष्टांग नमस्कार 🙏🙏

u/Cool_Aai — 3 months ago