Searching for my Shinde family history: Gwalior → Pimpalgaon (Barshi side?) | Helvi records & oral history
नमस्कार,🙏🏻
मी माझ्या शिंदे कुटुंबाच्या इतिहासाचा शोध घेत आहे आणि गेल्या काही दिवसांत काही खूप interesting गोष्टी सापडल्या, म्हणून हा पोस्ट टाकतोय. कदाचित इथल्या कुणाला याबद्दल माहिती असेल.
आमच्या कुटुंबात अनेक पिढ्यांपासून सांगितले जाते की आमचे पूर्वज ग्वाल्हेर (Gwalior) कडून महाराष्ट्रात आले. आम्हाला हे फक्त oral history म्हणून माहिती होते.
काही वर्षांनी आमच्याकडे Helvi (वंशावळ जपणारे लोक) आले होते. त्यांनी आमच्या पूर्वजांची नावे सांगितली आणि chanting मध्ये असा उल्लेख केला की:
“ग्वालियर गाव सोडून पिंपळगाववास आले तुमचे वाडवडील”
त्यांनी सांगितलेल्या lineage मधील काही नावे:
- शिदोजी / शिदू
- हारीबा
- हणमंत
- बारकोजी
- तात्यासाहेब
- नानासाहेब
- ज्ञानदेव
- धोंडीराव
- नरसू
- यशवंत
- नामदेव
आमच्या घरात “बाभुळगाव ” हे नावही अनेक पिढ्यांपासून सांगितले जात होते. विशेष म्हणजे Helvi ने सांगितलेल्या पिंपळगावच्या जवळच बाभुळगाव आढळले. ही गावं बार्शी परिसरात आहेत.
मी जुने online records and Google maps पाहताना:
- काही जुन्या Shinde records
- “शिंदे वाडा”
- “सरकार वाडा”
असे references सापडले.
1891 च्या काही कुणबी records मध्ये:
- “बाप सिदू”
- “हरी वा ... शिंदे”
अशी नावेही दिसली.
आमच्या कुटुंबाला काही ठिकाणी “शिंदे सरकार” असेही संबोधले जाते.
माझा उद्देश royal claim करणे नाही. मला फक्त:
- आमचे मूळ गाव कोणते?
- हा migration history खरा आहे का?
- कुणाच्या Helvi मध्ये similar history आहे का?
हे समजून घ्यायचे आहे.
जर कुणी:
- बार्शी जवळच्या पिंपळगाव / बाभुळगाव भागातील असाल,
- शिंदे कुटुंबाशी संबंधित असाल,
- Helvi genealogy बद्दल माहिती असेल,
- किंवा similar oral history ऐकली असेल,
तर कृपया comment करा 🙏