Maharashtra is another MP with better PR
सर्व प्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो की मी स्वतः पुणेकर आहे त्यामुळे मी परप्रांतीय असल्याचा आरोप करू नये.आज कामावरून घरी परतताना असे वाटले की मी अक्षरशः खेडेगावात आलो आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी,रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते समजत नाही.मी व माझं कुटुंब प्रत्येक वर्षी ७०००० रुपये कर भरतो,त्यातून मला वाटत नाही मला वैयक्तिक कुठलाही फायदा होतो.आमच्या सोसायटीत अजून corporation च पाणी येत नाही,दररोज ८०० रुपये टॅन्कर साठी लागतात.आज घरी आल्यावर अक्षरशः रडू कोसळले,असं वाटतं सगळे सोडून कुठे तरी दुसर्या शहरात निघून जावं पण तसं काही करू शकत नाही मी हे ही मला माहिती आहे.
खरच कधी कधी विचार येतो आपण लोकांना सांगतो आपला महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा किती तरी पटीने चांगला आहे पण खरच तसं आहे का?आजची परिस्थिती बघून खरच मला हा विचार आला.